गावाविषयी माहिती
वैतरणा नदीच्या संगमावर ऐनशेत हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. ऐनशेत गावात साईमंदिर हे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ८७0 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व भव्य व्यायामंशाळा-१ सभामंडप १ , अशी शैक्षणिक व शारिरीक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन १९९९ पासून ग्रामपंचायत ऐनशेत ने ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात शेती ,फळबाग , मोगरा शेती हि प्रमुख पिके घेतली जातात.
ऐनशेत ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना अंतर्गत प्रभावीपणे प्रमाणे राबविल्या गेल्या आहेत.
घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ऐनशेत गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODf प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ऐनशेत गाव आज तालुक्यातील एक आदर्श व सर्वागीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.